Source: RAIGAD NAGARI-4th March'2020
अंजुमन – ए – इस्लाम या अग्रणी संस्थेच्या
कालसेकर टेक्निकल कॅम्पस मध्ये नुकताच ‘उडान -२०२०’ महोत्सव उत्साहात संपन्न झाला. डिपार्टमेंट ऑफ लाईफ लाँग
लर्निंग अँड एक्सटेंशन द्वारा आयोजित या कार्यक्रमास स्कील
इंडिया व आयुष मंत्रालय,
भारत शासनाचे प्रतिनिधी श्री. विनयकुमार आवटे, डी.एल.एल
ई, मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. दिलीप पाटील, कालसेकर टेकनिकल कॅम्पसचे संचालक डॉ. अब्दुल रझ्झाक होनुटागी, स्कूल ऑफ फॉर्मसीचे डीन
डॉ.शारिक सय्यद, रोटरी क्लब, नवीन पनवेलचे अध्यक्ष श्री . विश्राम अकामवे आदि मान्यवर उपस्थित होते. उडान -२०२० महोत्सवास मुंबई विद्यापीठाशी संलग्न २० हून अधिक
महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला तसेच या कार्यक्रमांतर्गत पार पडलेल्या
पथनाटय व पोस्टर स्पर्धेत
३०० हून अधिक विध्यार्थ्यानी भाग घेतला. पथनाटय स्पर्धेत कोकण ज्ञानपीठ उरण कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला, तर सीकेटी महाविद्यालय
पनवेल, रामशेठ ठाकूर महाविद्यालय, खारघर व उरण कॉलेज
ऑफ मॅनेजमेंट यांना अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ पुरस्कार
मिळाले. पोस्टर स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयास प्रथम तर कोकण ज्ञानपीठ
उरण महाविद्यालयास द्वितीय पारितोषिक मिळाले. उरण कॉलेज ऑफ मॅनेजमेंटला तृतीय
पुरस्कार तर अंजुमन – ए
– इस्लाम स्कूल ऑफ फॉर्मसीला चतुर्थ
पुरस्कार मिळाला. संस्थेचे एक्झीकेटिव्ह चेअरमन श्री. बुरहान हारिस व कालसेकर टेक्निकल
कॅम्पसचे संचालक डॉ. अब्दुल रझ्झाक होनुटागी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न या कार्यक्रमासाठी प्रा.
अबुसुफियान शेख, प्रा. बंदेनवाज , प्रा .मारिया लाल, प्रा .रोहन दास, प्रा. मूर्तिझा, प्रा. इरफान नालबंद व त्यांच्या चमूने
विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट
आयोजनाबाबत उपस्थित सहभागी स्पर्धकांनी समाधान व्यक्त केले .